Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्नाला नकार दिल्याने वडिलांना पेट्रोल टाकून पेटवले

लग्नाला नकार दिल्याने वडिलांना पेट्रोल टाकून पेटवले



सोलापूर : खरा पंचनामा 

एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्यास वडिलांनी नकार दिल्याने मुलानेच वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

सोहेल बागवान अस संशयित मुलाचे नाव असून ३० डिसेंबर रोजी ही घटना घडल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली. याप्रकरणी लातूर येथील एक अल्पवयीन मुलीसह तीच्या अल्पवयीन भावालाही पोलिसांनी अटक केली आहे.

लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु, त्यांच्या लग्नास वडिल अफजल बागवान यांचा विरोध होता. त्यामुळे सोहेल हा आपल्या वडिलांवर चिडून होता. 

दरम्यान अल्पवयीन मुलगी व तीचा भाऊ शुक्रवारी सकाळी लातूर येथून पंढरपुरात आले होते. पंढरपुरातील नवीन एसटी बस स्थानकासमोर त्यांनी सोहेल बागवान याची भेट घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तीच्या भावाने तहसील कार्यालयाजवळ जावून अफजल बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले.

पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून ते पायी पुढे गेले. दरम्यान रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीने व तीच्या भावाने अफजल बागवान यांचे हातपाय बांधून डोक्यात दगड घालून खून केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.