'साहेब मी गद्दार नाही'...जाहिरातीची जोरदार चर्चा
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्त दैनिक 'सामाना'तील पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीची चर्चा रंगताना दिसत आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी सामनात ही जाहिरात दिली आहे. त्यावर साहेब मी गद्दार नाही... असा मजकूर ठळक अक्षरात छापण्यात आला आहे. मजकूरासोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे.
राऊत बंधुंनी या जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधल्याने आता शिंदे गट त्यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राऊत बंधुंनी मुखपत्र 'सामना'च्या मुखपृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारी जाहिरात दिली आहे.
या जाहिरातीत साहेब मी गद्दार नाही, असा मजकूर ठळक अक्षरात छापून शिंदे गटाला डिवचले आहे. त्यामुळे ही जाहिरात चांगली व्हायरल होताना दिसत आहे. या जाहिरातीत आणखीही मजकूर छापण्यात आला आहे. गेलेल्या 40 गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद.... जय महाराष्ट्र असाही उल्लेख जाहिरातीमध्ये आहे.
या जाहिरातीत फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देण्यात आला आहे. संजय राऊत किंवा सुनील राऊत यांचा फोटो देण्यात आलेला नाही. शिवाय जाहिरातीत सर्वात वर शिवसेनचं मशाल चिन्ह छापण्यात आलं आहे. त्याच्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव देण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.