मोदींकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर नाहीच : आंबेडकर
मुंबई : खरा पंचनामा
ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा वापर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातोय. नरेंद्र मोदी ईडी, सीबीआय किंवा आयकर यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही, ते जे करत आहेत ते त्यांच्या जागी मी असतो तरी तेच केलं असतं, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
एका पत्रकार परिषद ते बोलत होते. ज्यांच्या विरोधामध्ये हे सगळं सुरू आहे त्यंनी याआधी तसं वागल्यामुळे ते सुरू आहे, या कारवायात काहीही गैर नाही, या आधीपण अशाच कारवाया झालेल्या आहेत. कोणीही सत्ता राखण्यासाठी जे करतो तेच नरेंद्र मोदी करत आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे एकत्रित येतील हा माझा अंदाज आहे. त्याची कारणे विविध चौकशामध्ये आहेत. त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे तर तुम्ही एक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका घेताना दोन्ही काँग्रेस दिसत नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
मी माझी मतं यापूर्वी पण व्यक्त करत आहे. इथून पुढे पण मला जे वाटतं तेच बोलत राहणार. शरद पवारांबद्दलच्या वक्तव्यावर आजही आपण कायम असल्याचा पुनरुच्चार आंबेडकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये मध्यावती निवडणुका होतील अशी शक्यताही यावेळी त्यांनी व्यक्त केली. माझी भूमिका वैचारिक आहे. ज्यांना सत्तेचा लाभ मिळालेला नाही त्यांना तो लाभ मिळायला हवा, असेही ते म्हणाले. शरद पवार यांच्यासोबतच्या वक्तव्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, माझे शरद पवार यांच्याशी वाद नाहीत. महाराष्ट्रात राजकीय सामाजिक अभिसरण व्हायला पाहिजे होते, ते झालेले नाही, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.