त्यामुळे 'एक्साईज'ची पदके लटकली!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत (एक्साईज) यावर्षी प्रजासत्ताकदिनी विविध प्रकारच्या कामगिरी, सेवा, तपास याचे मूल्यांकन करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके देण्यात येणार होती. पण प्रजासत्ताक दिनाच्या आधीच काही दिवस त्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कमी कालावधीत प्रस्ताव मागवून ती देणे शक्य नव्हते. तरीही प्रस्ताव मागविण्यात आले होते. यावर्षी एक्साईजची ही पदके जाहीर करण्यात आली नाहीत. त्यामागचे मोठे कारण समोर आले आहे.
पोलिसांप्रमाणे कर्तृत्व/साहस/धाडस/योग्य तपास या निकषांवर एक्साईजमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदकासाठी निवड करण्यात येणार होती. यामध्ये राज्य शासनाकडून 2 गुणवत्तापूर्ण सेवा पदके, विशेष मोहिमाबद्दल 1, उत्कृष्ट तपासासाठी 4, आयुक्तांकडून आयुक्त सन्मानचिन्ह 5, विशेष सेवा पदके 6 अशी एकूण 18 पदके देण्यात येणार होती.
यासाठी शासनाने शिफारस समित्या स्थापन केल्या आहेत. राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या पदकांसाठी प्रधान सचिव, सचिव, उपसचिव, आयुक्त, सह आयुक्त यांची समिती नावांची शिफारस करणार आहे. आयुक्तांमार्फत दिल्या जाणाऱ्या पदकांसाठी आयुक्त, सह आयुक्त, दोन वरिष्ठ उपायुक्त, राज्याचे संचालक यांची समिती नावांची शिफारस करणार आहे.
या दोन्ही समित्यांनी दि. 15 जानेवारी पर्यंत शिफारस करायची होती. मात्र दि. 23 जानेवारी पर्यंत बहुतांशी प्रस्ताव आयुक्त कार्यालयात प्राप्त झाले नव्हते. शिवाय जेवढे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यांची संख्या अधिक होती. कमी कालावधीत त्या प्रस्तावांची छाननी करून पदके जाहीर करणे संबंधित समित्यांना शक्य नव्हते. त्यामुळे यावर्षी प्रजासत्ताकदिनी ती पदके देण्यात आली नाहीत. मात्र छाननी पूर्ण झाल्यावर शासन आणि विभागाचे मंत्री यांच्या मान्यतेने ती लवकरच ती देण्यात येतील असे या विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सूत्रांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.