पतीकडून पत्नीचा निर्घृण खून
जालना : खरा पंचनामा
जालना जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीचा निर्घृणपणे खून केला आहे. जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे.
कविता गजानन आढाव असे मृत महिलेचे नाव आहे. तर गजानन रघुनाथ आढाव असे नराधम पतीचे नाव आहे. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचा वर्षभरापूर्वी गजानन याच्याशी विवाह झाला होता. मागच्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. यामुळे पती गजानन विरोधात हर्सुल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नातेवाईकांनी दोघांमध्ये मध्यस्थी करून भांडण मिटवत दोघांमध्ये समन्वय घडवून आणला होता. त्यानंतर पती गजानन तिला सासरी घेवून गेला होता.
यानंतर काही दिवसांपूर्वी कविता हिची सासू कौशल्या हिच्यासह घरातील मंडळींनी घर विकत घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये, यासाठी तिचा छळ सुरु केला होता. यानंतर पती गजानन याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने हा खून वाटू नये म्हणून ट्रॅक्टर अंगावर घालून अपघाताचा बनाव केला. या प्रकरणी मृत कविता हिच्या भावाच्या फिर्यादीवरून गजाननवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.