पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सरफाची आत्महत्या
नाशिक रोड : खरा पंचनामा
येथील सराफ व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. चोरीचे सोने घेतल्याचा आरोप पोलिसांनी या सराफावर केला होता. पोलिसांवरच आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक रोड येथील सराफ व्यवसायिक दीपक दुसाने यांचे परिसरातील देवी चौकात सराफी दुकान आहे. उल्हासनगर येथील पोलिसांनी वारंवार चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करत त्रास दिल्याने त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली अशी माहिती मृत दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कालिदास दुसाने म्हणाले, २३ तारखेला दीपक यांच्या दुकानात ठाणे येथून पोलिस आले व त्यांनी दीपक यांच्यावर चोरीचे सोने घेतल्याचा आरोप केला. त्याची भरपाई म्हणून २ लाख ९० हजार रोख तर १२ ग्रॅम सोन्याची मागणी केली. मात्र हे पैसे त्यांनी दुकानात न घेता परिसरातील बिटको पॉईट येथे घेतले व कुठल्याही प्रकारचे लेखी कागदपत्र दिले नाहीत. त्यांच्या या त्रासाला कंटाळून माझ्या पुतण्याने आत्महत्या केली. त्यामुळे संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी केली आहे.
या घटनेचे वृत्त समजात त्यांचे नातेवाईक, मित्र व सराफी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिटको हॉस्पिटल येथे धाव घेतली. शवविच्छेदनानंतर आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी विरोध केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.