Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मला अटक करण्याच्या आदेशाची शिंदे यांना कल्पना होती : फडणवीस

मला अटक करण्याच्या आदेशाची शिंदे यांना कल्पना होती : फडणवीस



नवी दिल्ली : खरा पंचनामा

मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना मला अटक करण्याच्या त्या आदेशाबद्दल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती होती असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान आता पुन्हा एकदा मला अटक करण्याचे आदेश वळसे पाटलांचे नव्हते असे म्हणत फडणवीस यांनी सस्पेंस वाढवला आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी माध्यमांना बोलताना सांगितले की, हे मी अतिशय सत्य सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात कशाही प्रकारे मला कारागृहात टाकण्याचा तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होता.

याची सुपारी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी प्रयत्न करून पाहिले पण ते यशस्वी झाले नाहीत. यातली काही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आहे. फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे असेही फडणवीस म्हणाले.
 
दिलीप वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळल्याबद्दल फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, मी वळसे पाटलांवर कुठलाही आरोपच केलेल नाहीये. हा जो आदेश आला होता तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हता. तो वरून आलेला होता असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.