सांगलीत महाविद्यालयिन कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालय परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघा हल्लेखोरांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला.
यामध्ये विशाल निकम (वय ३५ रा. बोलवाड, ता. मिरज) जखमी झाला आहे. त्यानंतर तातडीने दुचाकी तेथेच टाकून हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
विशाल निकम चिंतामणराव मॅनेजमेंट ॲड रिसर्च महाविद्यालयात कॉम्पुटर लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी ९ वाजता ते नेहमीप्रमाणे महाविदयालयात गेले होते. मुख्य प्रवेशव्दाराजवळ ते आले असता त्यांच्याकडे तीन अनोळखी व्यक्तींनी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याबाबत विचारणा केली. त्याचवेळी हल्लेखोरांनी, निकम यांच्याकडे, तुम्हीच विशाल निकम का? अशी विचारणा केली.
विशाल यांनी होय असे सांगितल्यावर त्यातील एकाने त्याच्याकडील कोयत्याने विशाल यांच्यावर तीन वार केले.
त्यातील दोन वार विशाल यांनी चुकविले मात्र तिसरा वार त्यांच्या डाव्या दंडावर बसला. यामध्ये ते जखमी झाल्याने खाली कोसळले. त्यांना लाथाबुक्कयांनी देखील मारहाण करण्यात आली.
विशाल यांनी आरडाओरड केल्याने त्यांच्या मदतीला महाविदयालयातील काहीजण आले. त्यामुळे गडबडलेल्या हल्लेखोरांनी दुचाकी तेथेच टाकून पलायन केले. हल्लयाचे कारण समजू शकले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.