दाऊदला मदत: गुटखाकिंग जोशीसह तिघांना शिक्षा
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील संशयित, कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांना पाकिस्तानातील कराचीमध्ये गुटखा निर्मितीचा कारखाना उभारण्यास मदत केल्याच्या आरोप प्रकरणात गुटखा किंग जे. एम. जोशी व अन्य दोघांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
जोशी याच्याबरोबरच जमिरुद्दीन अन्सारी व फारुख मन्सुरी या दोघांना न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी दोषी ठरवले.
गुटखा व्यावसायिक रसिकलाल धारिवाल व जोशी यांच्यात आर्थिक वाद होता. तो सोडवण्यासाठी त्यांनी दाऊदकडे मदत मागितली होती. त्यानंतर दाऊदने २००२मध्ये गुटखा कारखाना उभारण्यासाठी धारिवाल व जोशी यांना मदत करायला सांगितले. त्याप्रमाणे दोघांनी मदत केली,' असा आरोप सीबीआयने ठेवला होता.
दरम्यान जोशी याने यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात एक मोठ्या ब्रॅंडचा गुटखा तयार करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. त्यानंतर त्याने गोवा गुटखा नावाने स्वतःचा ब्रँड तयार केला होता. जोशी याला गुटखा निर्मितीचा फॉर्म्युला चांगलाच माहिती होता अशी चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.