ओरोसमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडला!
बांदा : खरा पंचनामा
गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणाऱ्या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने गुरुवारी सकाळी ओरोस येथे कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या ४८ हजार दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे प्रभारी विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोवा बनावटीच्या दारुसह वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर (एमएच १२ आरएन ४४०३) असा एकूण ६० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी हाशीम कासम शेख (६१, रा. सांताक्रुझ मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १ हजार दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल अमोल यादव, विलास पवार, सुशांत बनसोडे, दीपक कापसे व योगेश शेलार यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.