गिरगाव येथे कर्नाटकातील तरुणाचा भोसकून खून
जत : खरा पंचनामा
जत तालुक्यातील गिरगांव येथील किरकोळ वादातून कर्नाटकातील महादेवप्पा राजशेखर हिरेमठ ( वय ३५ रा.विजयपूर, कर्नाटक) याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
गिरगाव येथे ग्रामपंचायत मार्फत दलित वस्ती येथे पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे. त्या कामांसाठी कर्नाटकातील विजयपूर येथून कामगारांना एका ठेकेदारा मार्फत आणण्यात आले होते. मृत महादेवप्पा व संशयित दत्ता यल्लाप्पा बजंत्री (रा. विजयपूर, कुंभार गल्ली ) यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर दत्ता बजंत्री याने धारदार शस्त्राने त्याच्या उजव्या बाजूस छातीवर व बरगड्यात वार केले. नंतर तो पसार झाला.
याबाबत महादेवप्पा याचा चुलत भाऊ प्रशांत हिरेमठ (रा.जोरापूर. जि. विजयपूर) उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले. अधिक तपास उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. शिंदे करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.