फसवणुकीतील फरारीस १७ वषार्नंतर अटक सांगली; एलसीबीची कारवाई
सांगली खरा पंचनामा
सांगली शहर पोलिस ठाण्यात २००७ मध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरारीस तब्बल १७ वषार्नंतर अटक करण्यात आली. निलेश निळकंठ शेवाळे (रा. गणेशनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगलीच्या एलसीबीने मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी फरारी संशयितांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी एलसीबीला यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक पथक तयार केले होते.
सांगली शहर पोलिस ठाण्यात २००७ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात निलेश शेवाळे हा फरारी होता. मंगळवारी सकाळी शेवाळे सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचून शेवाळे याला ताब्यात घेतले. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.