सांगलीत जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; चौघांना लागण
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात एका महिलेचा समावेश असून चौघांचीही प्रकृती स्थिर आहे. चौघेही गृहअलगिकरणात असून त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, घाबरण्याची कोणतीही परिस्थिती नसून जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरीकांना समाजिक अंतर, मास्क, सॅनिटाझरसह कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत नियमांच्या पालनामुळे रुग्णसंख्या अटोक्यात आली. त्यानंतर रुग्णसंख्या शुन्यावर आली होती. तरीही कोरोना नियमांच्या पालनासाठी प्रशासनाकडून आग्रह केला जात होता.
२५ नोव्हेंबर रोजी सांगलीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेल्या ४५ दिवसात एकही रुग्ण आढळला नव्हता. काल चौघांना कोरोनाची लक्षणे समोर आल्यानंतर स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांचे पॉझिटिव्ह अहवाल आज प्राप्त झाले.
आटपाडी, जत, तासगाव तालुक्यात प्रत्येक एक रुग्ण, तर महापालिका क्षेत्रात एक रुग्ण आढळून आला आहे. सर्व रुग्ण गृहअलगिकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सांगली जिल्ह्यात अत्तापर्यंत दोन लाख १५ हजार ४३६ रुग्ण पॉझिटिव्ह झाले. त्यापैकी दोन लाख ९ हजार ९१५ रुग्ण बरे झाले. ५ हजार ५१७ जणांचा मृत्यू झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.