प्रेमसंबंध मान्य नसल्याने भाऊ, वडिलांनी केला मुलीचा खून
नांदेड : खरा पंचनामा
मुलीचे असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनीच मुलीचा निर्घृणपणे खून केला. ही धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. मुलीचा खून करून तिला जाळल्यानंतर राख उधळून दिल्याची माहिती समोर आली आहे.
मुलीच्या मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानं ही खुनाची घटना उघडकीस आली. नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी इथं ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वैशाली जोगदंड असे खून झालेल्या मुलीच नाव आहे. ती नांदेड इथं बीएएमएसच्या तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती. ही घटना रविवारी घडली आहे.
आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने वडीलासह भावांनी मिळून मुलीस क्रुरपणे मारहाण करुन तिचा खून केला. तसेच तिला जाळून तिची राख उधळून लावल्याची माहिती समोर आली आहे. तर मुलाचे अपहरण केल्याची माहिती देखील मिळत आहे.
या घटनेमुळं महिपाल पिंपरी गाव दहशतीत आहे.
या घटनेप्रकरणी रात्री उशीरा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिष्ठेपोटी आई वडिलांनी मुलीला जीवे मारल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत मुलीचे वडील, भाऊ, मामा, दोन चुलतभाऊ अशा पाच लोकांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.