Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दूरदर्शनचे वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

दूरदर्शनचे वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन



मुंबई : खरा पंचनामा

दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केलं आहे. त्यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक होते. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते.

मला भेटलेली माणसे हा त्यांचाय एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. शिवाय त्यावेळी दूरदर्शनवर असलेला वाद-संवाद हा कार्यक्रम मेहेंदळे यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता. 

यशवंतराव ते विलासराव, आपले पंतप्रधान यासह १८ हून अधिक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं आहे. शिवाय त्यांनी काही नाटकांमध्येही काम केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.