मुलींशी गैरकृत्ये करणाऱ्या शिक्षकाला अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील शाळेतील मुलींशी गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली. विजयकुमार परशुराम बागडी (वय५२, मुळ रा. सोळांकुर ता. राधानगरी, सध्या रा. फुलेवाडी रिंगरोड) असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्याद दिल्यानंतर दोन तासातच उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी बागडी याला अटक केली.
शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील पंधरा ते सोळा वयोगटातील सात मुलींचे महिनाभरापुर्वी लैगिक शोषण झाले होते. या गंभीर प्रकरणाची माहीती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संस्थेकडे तक्रार केल्यानंतर बागडीची बदली करण्यात आली. त्यानंतर समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या गीता हसुरकर यांना शोषीत मुलींनी घडलेल्या प्रकाराची माहीती दिली. मुलींच्या धाडसीवृतीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी सोमवारी सकाळी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर बागडीस अटक करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.