मजुरांना घेऊन जाणार टेम्पो गेला थेट दरीत!
सातारा : खरा पंचनामा
महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटात तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणारा टेम्पो थेट दरीत कोसळला आहे. 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. तेथे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
टेम्पोतील मजूर बुलढाणा व अकोला भागातील आहेत. अपघातातील जखमींना सह्याद्री ट्रेकर्सचे जवान बचाव कार्यासाठी मदत करत आहेत. महाबळेश्वरहून तापोळा मार्गावर हा अपघात झाला आहे. आज शनिवारी सकाळी 8 वाजता हा अपघात मुकदेव घाटात झाला आहे.
मजूरांना टेम्पोमधून नेण्यात येत होते. घाटातून मजूरांना घेवून जाताना तीव्र उतारावरून हा टेम्पो कोट्रोशी पुलाजवळ पलटी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात येणार आहे. अद्याप अधिकृत जखमी व मजूरांची संख्या समजली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.