Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता 'बीडीएस'चा अभ्यासक्रमही साडेपाच वर्षांचा!

आता 'बीडीएस'चा अभ्यासक्रमही साडेपाच वर्षांचा! 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

आता बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पदवीचा अभ्यासक्रमही एमबीबीएसप्रमाणं साडेपाच वर्षांचा असणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार झाला असून, याची तयारीही सुरू झालीये. यासोबतच बीडीएसचं सत्रही वार्षिक ऐवजी सहा महिन्यांच्या सेमिस्टरच्या स्वरूपात असणार आहे. त्याची शिफारस डेंटल कौन्सिल ऑफ इंडियानं केंद्र सरकारकडं पाठवली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं BDS अभ्यासक्रम बदलण्याच्या DCI च्या प्रस्तावाला सहमती दर्शवलीये. 

आता बीडीएस अभ्यासक्रम एक वर्षाच्या इंटर्नशिपसह पाच वर्षांचा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नवीन सत्रापासून हा अभ्यासक्रम एक वर्षाच्या इंटर्नशिपसह साडेपाच वर्षांचा असेल. या बदलांतर्गत एमबीबीएसप्रमाणं सेमिस्टर पद्धत लागू करण्यात येणार आहे. संपूर्ण कोर्समध्ये एकूण नऊ सेमिस्टर असतील आणि एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागेल. याअंतर्गत बीडीएसच्या विद्यार्थ्यांनाही एमबीबीएसप्रमाणं दर सहा महिन्यांनी परीक्षा द्यावी लागणार आहे. तर, आता विद्यार्थी वर्षातून एकदाच परीक्षा देतात. 

या अभ्यासक्रमांतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लागू होईल. सेमिस्टर प्रणाली सुरू केल्यामुळं शिकणं सोपं होणार आहे. कारण, विद्यार्थ्यांना वर्षभर आठही विषयांवर काम करण्याऐवजी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी केवळ 3-4 विषयांवर काम करावं लागणार आहे. नवीन प्रणालीसह बहुतेक विस्तृत विषय वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये विभागले जाऊ शकतात, जे दोन किंवा अधिक सेमिस्टरमध्ये विभागले जाऊ शकतात. नवीन अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.