व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अॅडमिनची जिभच कापली
पुणे : खरा पंचनामा
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण करत त्याची जीभच कापल्याची घटना घडली आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात हा प्रकार घडला.
याबाबत प्रिती किरण हरपळे (वय-38) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्याच्या फुरसुंगी जवळ असलेल्या ‘ओम साई सोसायटी’त 28 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रिती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. सोसायटीत राहणाऱ्या सभासदांनी मिळून सोसायटीचा नावाने एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपचे ॲडमिन फिर्यादी यांचे पती किरण हरपळे हे होते. या ग्रुपमधील सभासद सुरेश पोकळे हे वारंवार अश्लिल मेसेज टाकत असल्याने ग्रुप अॅडमीन हरपळे यानी पोकळे यांना ‘ओम हाईटस ऑपरेशन’ या ग्रुपमधून रिमूव्ह केले.
सुरेश पोकळे यांनी ग्रुपमधून रिमुव्ह का केले? असा मेसेज पाठवला.
मात्र त्याला हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे पोकळे याने हरपळे यांना फोन करुन मला तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणून हरपळे यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले.
त्यावेळी पोकळे याने ग्रुपमधून मला का काढले अशी विचारणा केली. त्यावेळी हरपळे यांनी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज टाकत आहे. त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले. यामुळे चिडलेल्या पोकळे यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने किरण हरपळे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांची जीभ कापली गेली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.