सासू-सासऱ्याने जावयाला पेट्रोल टाकून पेटवले!
पुणे : खरा पंचनामा
पती-पत्नीतील वादामुळे ते वेगळे रहात आहेत. त्या कारणावरुन सासु सासऱ्यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या घटनेत जावई गंभीर भाजला आहे. ही घटना पुण्यातील खराडीमधील रिलायन्स मॉलकडून खराडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
याबाबत लखन बाजीराव काळे ( वय ३२, रा. शिरुर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासरे रजित ऊर्फ गेंड्या याजिंदर भोसले, सासु बासुंदी रंजित ऊर्फ गेंड्या भोसले, साडु अलताफ विजय काळे, पत्नी पेडम लखन काळे, मेहुणा कावकर रंजित ऊर्फ गेंड्या भोसले (सर्व रा. झेन्सार कंपनीसमोर, खराडी) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
लखन काळे व त्याची पत्नी पेडम यांच्यात कौटुंबिक वाद आहे. त्यामुळे त्याची पत्नी, मुलगा व मुलगी हे फिर्यादी सोबत रहात नाही. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. शुक्रवारी सायंकाळी लखन हे झाडाखाली बसले असताना त्याचे सासु सासरे व इतर तेथे आले. पत्नीस नांदवित नसल्याच्या कारणावरुन त्यांनी लखन यांना मारहाण केली.
सासु सासरे यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पेट्रोल लखन यांच्या अंगावर टाकले. नंतर सासुने काडी पेटवून त्यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यात लखन यांचे पोट, पाठ, गळा, छाती व दोन्ही हात भाजले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.