'ती' खेळी शरद पवार यांचीच : जयंत पाटील
मुंबई : खरा पंचनामा
दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी एक महत्वाची घटना घडली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनात पहाटेच शपथविधी केला होता. त्यानंतर मात्र या प्रकरणाची राज्यात खूप चर्चा झाली. त्यातच त्या प्रसंगावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक धक्कादायक विधान केले.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा शरद पवार यांचीच खेळी असल्याचे विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारनात खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे.
त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही.’ असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.