13 वर्षीय मुलीला नाल्यात फेकून बापाचा आत्महत्येचा प्रयत्न!
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात १३ वर्षीय मुलीला नाल्यात फेकून तिचा खून केल्यानंतर बापाने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पुणे शहरातील स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
याप्रकरणात मृत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.
१३ वर्षीय मुलीची हत्या करून तिच्या वडिलांनी तिचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वतः बापाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील २ तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.