नोकरीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक
सांगली : खरा पंचनामा
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची तेरा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २० जून २०२० ते १८ ऑगस्ट २०२० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश विठ्ठल पेटकर (वय ४०, रा. प्रगती कॉलनी, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. युसुफ मोहम्मदहुसेन नदाफ (रा. विनायकनगर, वारणाली, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. नदाफ आणि संशयीत पेटकर यांची ओळख होती. त्याचा फायदा घेत पेटकर याने फिर्यादीचा भाऊ खालीद यास नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युसूफकडून पाच लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादी नदाफ यांचे मित्र मुजफ्फर याची बहिण निलोफर यांना नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून आठ लाख घेतले.
मात्र नोकरी न मिळाल्याने दोघांनीही दिलेले पैसे संशयीत शैलेश पेटकर यास वेळच्यावेळी परत मागितले. पण त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे युसुफ नदाफ यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयीत पेटकर याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.