Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कौलगेत 25 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी!


कौलगेत 25 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी!



तासगाव : खरा पंचनामा

तासगाव तालुक्यातील कौलगे येथील सुमारे 25 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लागलेली आग दुपारपर्यंत धुमसत होती. यामध्ये 12 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

सावर्डे-कौलगे रस्त्याकडेला असलेल्या उभ्या उसाने सकाळी अचानक पेट घेतला. हा हा म्हणता ही आग आजूबाजूला पसरली. आगीचे रौद्ररूप पाहून ती विझविण्यासाठी जाण्याचे शेतकऱ्यांचे धाडस झाले नाही. आग आपोआप आटोक्यात आल्याचे दिसत असतानाच शेजारच्या शेतातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होता. 

ही आग इतकी रौद्र होती की आगीचे लोळ आणि धुराचे लोट सर्वत्र दिसत होते. यामध्ये आतापर्यंत 25 एकरातील ऊस जळून खाक झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. डोळ्यादेखत उभे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.