27 लाख घेणारा पोलिस उपनिरीक्षक निलंबित
नागपूर : खरा पंचनामा
'क्रिप्टोकरन्सी'साठी १ कोटी ८० लाख रुपये दिल्यावरही ती करन्सी न मिळाल्याने केलेल्या तक्रारीच्या अर्जावरून धमकावत २७ लाख रुपये घेणारा पोलीस उपनिरीक्षक धनाजी मारकवाड यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
धनाजी मारकवाड हे कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी वास्तूविशारद असलेले किशोर झाम यांना अजय बत्रा यांनी १ कोटी ८० लाख रुपये दिले होते, तसेच त्यातून कॉरबिट नावाची क्रिप्टो करन्सी घेण्यासाठी त्यांनी सांगितले; मात्र किशोर झाम यांनी ती करन्सी खरेदी न करता तो पैसा स्वतःच्या लाभासाठी वापरला आहे, असा आरोप बत्रा यांनी केला आहे. त्याविषयी त्यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार केली होती.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी मारकवाड करत होते. त्यांनी किशोर झाम यांना त्यांच्याविरुद्ध एम्.पी.आय.डी. नियम लावून त्यांना कारागृहात टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी अजय बत्रा यांच्याकडून प्रकरण मिटवण्यासाठी २७ लाख रुपये घेतले. किशोर झाम यांनी याविषयी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करून मारकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्यांना आता निलंबित करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.