दुःखद : शिवज्योत आणताना 2 शिवभक्तांचा अपघातात मृत्यू
कोल्हापूर : खरा पंचनामा
आज संपूर्ण जगासह भारतात आणि महाराष्ट्रात शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, यादरम्यान कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवज्योत आणताना झालेल्या अपघातात दोन शिवभक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे.
दुचाकींची धडक इतकी जोरदार होती की, संतोष पाटील आणि अक्षय पाडळकर या तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्याबरोबर असलेले तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर शहरातील कदमवाडी इथं राहणारा संतोष बाळासाहेब पाटील आणि भोसलेवाडी इथं राहणारा अक्षय सुरेश पाडळकर अशी या अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर निलेश संकपाळ हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
जखमी निलेश संकपाळ याच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी आणि मित्र मंडळींनी सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. शिवजयंती दिनी दोघांचा असा अंत झाल्याने कदमवाडी आणि भोसलेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.