कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 3 माजी संचालकांची ईडीकडून चौकशी
कोल्हापूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून ईडीचा ससेमिरा सुरू आहे. मागच्या महिन्यात पहिल्यांदा त्यांच्या घरासह मुलांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. दरम्यान मागच्या 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेसह मुश्रीफांचा हमिदवाडा येथे असणारा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर छापे टाकण्यात आले. दरम्यान ईडीकडून पुन्हा जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेली ईडीची चौकशी आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माजी संचालकांपर्यंत येऊन पोहोचली आहे. सध्या मुश्रीफांच्या जवळ असलेल्या तीन माजी संचालकांची चौकशी सुरू आहे. पुढच्या काळात इतरही माजी संचालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्याला कर्जवाटप प्रकरणी ही चौकशी होत असल्याची चर्चा आहे.
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (दि.17) सुनावणी झाली. दरम्यान यावर ईडीने जामीन अर्जावर विरोध करत मुंबई सत्र न्यायालयात लेखी उत्तर सादर केले आहे. ईडीनं मुश्रीफ यांना अटकपूर्व जामीन देण्यास यावर विरोध केला आहे. यामुळे मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन दिला तर ईडीकडून तपासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.