Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपने अदानीची 30 मिनिटे चौकशी करून दाखवावी : राऊत

भाजपने अदानीची 30 मिनिटे चौकशी करून दाखवावी : राऊत



मुंबई : खरा पंचनामा 

हिंडेनबर्ग या रिसर्च एजन्सीने अदानी समूहावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. मात्र केंद्र सरकारने यासंबंधात काहीही चौकशी केलेली नाही. भाजपने अदानींची 30 तास नव्हे 30 मिनिटं तरी चौकशी करून दाखवावी, असं आव्हान संजय राऊत  यांनी दिलं आहे. 

इतरांच्या मागे ईडी- सीबीआय सारख्या तपासयंत्रणा लावतात. पण देशात एवढा महाघोटाळा झाला असताना केंद्र सरकार गप्प का, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. घोटाळा झाल्याचं हिंडेनबर्ग या अमेरिकन एजन्सीने सांगितलं असताना ईडी आणि सीबीआय तिकडे का जात नाही, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

गौतम अदानी यांच्या अधिपत्याखालील अनेक कंपन्यामधून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. अनेक वर्षांपासून गुंतवणुकदारांना फसवलं जात असल्याचा आरोप हिंडेनबर्ग या अमेरिका स्थित रिसर्च एजन्सीने केला आहे. एजन्सीने नुकत्याच केलेल्या एका संशोधनाच्या अहवालात हे आरोप करण्यात आले आहेत. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेना आणि माझ्याबद्दल वारंवार खोटी वक्तव्ये करत आहेत. अशा खोट्या माणसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्री म्हणून आपल्या जवळ ठेवतात तरी कसे, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांना मीच खासदार केलं. त्यांच्यासाठी मीच पैसे खर्च केल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. हे वक्तव्य आता कोर्टात सिद्ध करा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.