Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रक-बसच्या अपघातात 4 ठार; दोन पोलिसांचा समावेश

ट्रक-बसच्या अपघातात 4 ठार; दोन पोलिसांचा समावेश



दौंड : खरा पंचनामा

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्याच्या हद्दीत चौफुला येथे बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वीसहून अधिक प्रवाशी गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. बुधवारी पहाटे हा भीषण अपघात झाला. यातील मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. तर टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर ही बस आदळून अपघात झाला. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली.

या अपघातातील जखमींना नजिकच्या केडगाव येथील दवाखान्यात तर काही गंभीर जखमींना पुण्याला हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या चार मृतांमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही यात मृत्यू झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.