वादग्रस्त स्वप्नील कोळीला 4 दिवसाची पोलिस कोठडी
सांगली : खरा पंचनामा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडेच खंडणी मागणारा वादग्रस्त पोलिस हवालदार स्वप्नील कोळी याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान कोळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान देत नव्हता तसेच त्याची कलेक्शन फेम म्हणून ओळख होती अशी जिल्हा पोलिस दलात चर्चा आहे. त्याच्यावरील कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कोळी दलात दाखल झाल्यापासून सहकारी लोकांशी फटकून वागत होता. तो ठाण्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना किंमत देत नव्हता. दप्तरी म्हणून काम करत असल्याने त्याला बारकावे माहिती होते. म्हणूनच तो सहकाऱ्यांना टाळत होता. शिवाय कलेक्शन मिळवण्यासाठी त्याने बऱ्याच सहकाऱ्यांचा बळी दिल्याचीही पोलिस दलात चर्चा आहे.
त्याच्याबाबत आलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी त्याची बदली मुख्यालयात केली होती. शिवाय सध्याचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनाही त्याच्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत त्याची बदलीही केली होती.
त्याने केलेले काळे कारनामे बाहेर पडत असून सध्याच्या बलात्कार, खंडणी गुन्ह्यातील तपासानंतर आणखी काही खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.