Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर जिल्हा बँकेचे 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात!

कोल्हापूर जिल्हा बँकेचे 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात!



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बुधवारपासून ईडीने ठाण मांडलं आहे. आता या प्रकरणी ईडीने पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

जिल्हा बँकेसह ईडीने हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारख्यान्यावरही कारवाई केली. गेल्या ३० तासांपासून ईडीकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी सुरू होती. ईडीने पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेता बँकेतून चार बॉक्स भरून कागदपत्रेही नेली आहेत. ईडीने पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर बँकेचे इतर कर्मचारी संतप्त झाले आहेत.

तर बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच जणांना ईडीने ताब्यात घेतलंय यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, आर. जे. पाटील, आर. जे पाटील, अल्ताफ मुजावर उप व्यवस्थापक ( साखर कारखाना कर्ज वाटप विभाग), सचिन डोंडकर, निरीक्षक ( साखर कारखाना कर्ज वाटप विभाग) यांचा समावेश आहे. 

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपांममध्ये ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते.

तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणाची मागील सहा महिन्यांपासून आम्ही चौकशी करत होतो अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.