मुश्रीफ यांचा घोटाळा 500 कोटींच्यावर : सोमय्या
कोल्हापूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा हा ५०० कोटींच्या वर असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. जिल्हा बँकेसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ते जाणार आहेत.
माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आधीच आरोप केलेले आहेत. याचबाबत ते आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेलाही सोडलं नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि घोरपडे सहकारी साखर कारखान्यालाही लुटण्यात आलं. आता त्यांची सर्व बाजूने चौकशी सुरू आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी मी आज बँकेला भेट देणार आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, आधी मुश्रीफ यांचा घोटाळा १५८ कोटी रूपयांचा असल्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात हा आकडा पाचशे कोटींपेक्षा जास्तचा असून या प्रकरणात आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत, असेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.