Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रातील 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याकरण्यात आल्या आहेत. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह- आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच दिपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले अधिकारी असे, 
राजेंद्र भोसले, IAS (2008), या आधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिपा मुधोळ मुंडे, IAS (2011) या आधी औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासक, आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाविनोद शर्मा, IAS (2011) या आधी बीडचे जिल्हाधिकारी, आता औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सिद्धार्थ सालीमथ, IAS (2011) यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निधी चौधरी, IAS (2012) या आधी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी, आता मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह- आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.