Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईडीने ताब्यात घेतलेल्या त्या 5 अधिकाऱ्यांना सोडले

ईडीने ताब्यात घेतलेल्या त्या 5 अधिकाऱ्यांना सोडले



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्हा बँकेवर 'ईडी'ने छापा टाकून ताब्यात घेतलेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखर विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, बँक निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे यांना शुक्रवारी रात्री उशिरा जबाब घेऊन सोडून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या पाच अधिकाऱ्यांनी साक्षीत काय सांगितले, याचे तर्क-वितर्क लढविले जात असून, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. विशेषतः, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या साक्षीतून कोणाची नावे पुढे येणार, याचीच जिल्हा बँक वर्तुळात चर्चा होती. 

बुधवारी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह बँकेची सेनापती कापशी (ता. कागल) व हरळी (ता. गडहिंग्लज) येथील शाखांवर छापे टाकून चौकशी केली होती. जिल्हा बँकेतील तीस तासांच्या छाप्यानंतर पाचजणांना ताब्यात मुंबईत नेले होते. या पाच अधिकाऱ्यांना मुंबईला साक्षीसाठी नेल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. आता या पाच अधिकाऱ्यांच्या साक्षीतून कोणती माहिती बाहेर येणार तसेच ते कोणाकोणाची नावे घेणार, यावर 'ईडी'ची पुढील चौकशी अवलंबून आहे, असे सांगितले जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.