ठाकरे यांच्या बंगल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
रायगड : खरा पंचनामा
उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगले घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाचा देखील समावेश आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर, प्रशांत मिसाळ यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वेळोवेळी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कर आकारणी प्रक्रियेचा जाणीवपुर्वक अंमल केला नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंदवहीमध्ये बेकायदेशीर नोंदी घेऊन खोटे दस्ताऐवज तयार केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानं उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले होते, या प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.