Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मद्यधुंद पोलिसाने कार चालवत दिली 8 गाड्यांना धडक!

मद्यधुंद पोलिसाने कार चालवत दिली 8 गाड्यांना धडक!


रत्नागिरी : खरा पंचनामा

रत्नागिरी येथे पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत गाडी चालवत तब्बल आठ गाड्यांना धडक दिली. रत्नागिरी शहराजवळील कुंवारबाव येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या असलेल्या एका पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

ही घटना घडल्यानंतर या प्रकरणाची तक्रार कोणी केलेली नव्हती मात्र पोलिस अधीक्षक यांनी दखल घेतल्याने या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा असे प्रकार घडू नयेत अशी वॉर्निंग पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी अलीकडे दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर एक कर्मचारी व्यसनमुक्ती केंद्रात सध्या उपचार घेत आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

ड्रंक अँड ड्राइव करण्याचाच हा प्रकार होता हे आता स्पष्ट झालं आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास हातखंबावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल आठ गाड्यांना ठोकल्याची घटना घडली होती. हे पोलीस कर्मचारी नाणीज येथील बंदोबस्त आटपून गाडी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत असताना हातखंब्याच्या पुढे कुंवारबावपर्यंत जवळजवळ आठ गाड्या त्यांनी धडक दिल्याची घटना घडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.