तर मविआ सरकार आधीच कोसळले असते : अनिल देशमुख
वर्धा : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी धक्कादायक दावा केला. मला तुरुंगात एक अशी ऑफर आली होती, ती स्वीकारली असती, तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार खूप आधीच पडले असते, असे ते म्हणाले.
अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ महिने तुरुंगात होते आणि आता जामिनावर बाहेर आहेत. अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती आणि गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांनी वर्धा येथील सेवाग्राम येथे नदी व वन संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओच्या सामूहिक वनहक्कांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. ते म्हणाले की, मला तुरुगात एक ऑफर आली होती, जी मी नाकारली. जर मी तडजोड केली असती (ऑफर स्वीकारली) तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी पडले असते, पण माझा न्यायावर विश्वास आहे. म्हणून मी तुरूंगातून बाहेर सुटका होण्याची वाट पाहत होतो.
यापूर्वी शनिवारी अनिल देशमुख म्हणाले की, माझ्यावर १०० कोटी रुपयांचा (मनी लाँड्रिंग) आरोप आहे, मात्र आरोपपत्रात ही रक्कम १.७१ कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते म्हणाले, तपास यंत्रणा १.७१ कोटी रुपयांचे पुरावे देखील सादर करण्यात अपयशी ठरली.
सीबीआय आणि ईडीने नोंदवलेल्या खटल्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आले. ते म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मात्र ते आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगासमोर हजर झाले नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.