नंदेश्वर येथे तीन महिलांचा निर्घृण खून!
मंगळवेढा : खरा पंचनामा
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच घरातील तीन महिलांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. एकाच वेळी तीन महिलांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) अशी मृत महिलांची नावे आहेत. घटनास्थळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वर गावात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञाताने या तीन महिलांचा त्यांच्या राहत्या घरासमोर धारदार हत्याराने खून केला. तिन्ही महिलांचे मृतदेह घरासमोर अस्ताव्यस्त पडले होते.
या घटनेने नंदेश्वर गावात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले.
खुनाच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला असून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या तीन महिलाच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या खून सत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.