Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टिकावाने हल्ला करून दाम्पत्याचा निर्घृण खून

टिकावाने हल्ला करून दाम्पत्याचा निर्घृण खून



पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा

पिंपरी चिंचवड दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीच हल्लेखोराला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी रात्रीच्या सुमारास जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. शहरातील दापोडी परिसरात ही घटना घडली. या घटनेत 61 वर्षीय शंकर काटे आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी संगीता काटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर 45 वर्षीय संशयित प्रमोद मगरुडकर खून करून मृत दाम्पत्याच्या रक्ताने माखला होता. तो स्वतः ही जखमी झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत हातात टिकाव घेऊन रस्त्याने फिरत असताना नागरिकांनी त्याला पकडले आणि घटनेबाबत पोलिसांना कळवले.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याने दोघांचा खून का केला? याचा तपास भोसरी पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.