तक्रार द्यायला आलेल्या महिलांची महिला पीएसआयला धक्काबुक्की
पुणे : खरा पंचनामा
एकमेकीविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केली. याप्रकरणी एका महिला पोलीस उपनिरीक्षकांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी सुगरा मेमन आणि कोकीळा मकवाना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लष्कर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगरा मेमन आणि कोकीळा मकवाना या दोघी महात्मा गांधी रोडवर पथारी लावतात. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी फिर्यादी या त्यांच्याकडे चौकशी करत होत्या. फिर्यादीच्या जवळ येऊन म्हणाल्या तुम्ही बाहेर पडा, मग तुमचेकडे बघुन घेतो, अशी धमकी दिली. तसेच दोघींनीही फिर्यादी यांच्यासोबत अरेरावीची भाषा करुन गोंधळ घालून फिर्यादी यांना धक्काबुक्की केली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुगरा मेमन हिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.