जतमध्ये दोन सराईत चोरट्यांना अटक, साडेआठ लाखांचे दागिने जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जत आणि कुंभारी येथील दोन सराईत चोरट्यांना एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोघांकडून घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
किशन ऊर्फ कल्लाप्पा ऊर्फ फांग या रतन चव्हाण (वय २४, रा. उमराणी रोड, जत) सुरेश तुळशीराम चव्हाण (वय २९, रा. कुंभारी ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगली जिल्हयातील घरफोडीच्या गुन्हयांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आढावा बैठक घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी एक पथक तयार केले होते.
पथकाने जत विभागात घरफोडी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांची माहिती घेत असताना रेकॉर्ड वरील गुन्हेगार किशन चव्हाण व सुरेश चव्हाण हे दोघे चोरी केलेले सोन्याचे दागिने सोलापुर येथे विक्री करीता घेऊन जाण्यासाठी जत ते उमदी रोडलगत, सिध्दार्थ पब्लिक स्कुल जवळ वाहनाची वाट पाहत थांबले आहेत अशी माहिती पथकाला मिळाली.
पथकाने तेथे सापळा लावुन त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष किशन ऊर्फ कल्लाप्पा चव्हाण व सुरेश तुळशीराम चव्हाण यांची अंगझडती घेतली असता, किशन ऊर्फ कल्लाप्पा याचे पॅन्टच्या खिशात सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, सोन्याचे गंठण, लहान सोन्याच्या अंगठया मिळाल्या तसेच सुरेश चव्हाण याचे अंगझडती मध्ये पॅन्टच्या खिशात सोन्याचे कानातील टॉप्स एक जोड, दोन अंगठया मिळाल्या. मिळाले सोन्या चांदीच्या दागिने बाबत दोघांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी उमदी, जत आणि कवठेमहांकाळ येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे साडेआठ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोघांनाही उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. किशन ऊर्फ कल्लाप्पा ऊर्फ फांग या रतन चव्हाण याच्या विरुध्द विजापुर (ग्रामीण) विजापुर (शहर) तिकोटा, अथणी, बबलेश्वर (कर्नाटक), जत या ठिकाणी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, संकेत मगदुम, मच्छिद्र बर्डे, संतोष गळवे, सचिन कनप, सागर टिगरे, शुभांगी मुळीक, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.