पती, सासूचा खून करून मृतदेहाचे तुकडे ठेवले फ्रीजमध्ये!
गुवाहाटी : खरा पंचनामा
गुवाहाटीमध्ये एका महिलेने प्रियकरासह पती आणि सासूची निर्घृण हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्यांना मेघालयात नेऊन दरीत फेकले होते. ही घटना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घडली होती, ज्याचा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे.
आरोपी बंदना कलिता हिने तिचा प्रियकर धनजीत डेका आणि त्याचा मित्र अरुप दास यांच्या मदतीने पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे यांचा खून केला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आणि सासू यांचा खून केल्यानंतर या लोकांनी त्यांचे तुकडे केले. त्यानंतर त्यांना तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि कारमधून शेजारच्या मेघालय राज्यात नेले. याठिकाणी हे तुकडे दोन वेगवेगळ्या ठिकाणी खोल दरीत फेकून दिले जेणेकरून पुरावा नष्ट केला जाईल.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या सासूच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. आता पतीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. तिन्ही आरोपींकडून मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे हा शोध घेण्यात येत आहे. गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंत बराह म्हणाले, सुमारे सात महिन्यांपूर्वी ही हत्या झाली होती. आम्ही तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. पत्नीने सप्टेंबरमध्ये पती आणि सासू यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला होता.
अमरेंद्र डे आणि शंकरी डे अशी पती आणि सासू- सासऱ्यांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळानंतर अमरेंद्रच्या चुलत भावाने दुसरी बेपत्ता तक्रार दाखल केली, ज्यामुळे पत्नीवर संशय निर्माण झाला, चौधरी म्हणाले. दोन्ही गुन्ह्यांची नूनमती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोन्ही हत्या गुवाहाटीतील चांदमारी आणि नारेंगी भागात दोन वेगवेगळ्या घरात घडल्या.
अमरेंद्रची पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य एका व्यक्तीने ही हत्या केली होती. तो तिचा बालपणीचा मित्र असल्याचा संशय आहे. हत्येनंतर, त्यांनी मृतदेहांचे छोटे तुकडे केले, ते पिशव्यांमध्ये भरले आणि मेघालयला नेले, असे चौधरी म्हणाले. तेथे त्यांनी ते तुकडे दरीमध्ये फेकले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.