Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खटला सुरु होत नाही तोपर्यंत सुटका करा : सचिन वाझे

खटला सुरु होत नाही तोपर्यंत सुटका करा : सचिन वाझे



मुंबई : खरा पंचनामा

प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटलिया प्रकरणानंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून ह्या प्रकरणांमध्ये आरोप ठेवला गेला होता. हा खटला जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत सुटका करावी यासाठी न्यायालयात धाव घेत असल्याचे सचिन वाझे याने याचिका दाखल केली आहे. त्यात त्याने सुटकेची मागणी केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि दुसरे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे हे दोघे जामीनावर बाहेर आहेत. त्यामुळे सचिन वाजे याने सुटका मिळावी यासाठी याचिका केली. मात्र सीबीआयने सचिन वाझे याच्या या याचिकेला विरोध केला आहे.

सचिन वाझे याच्या याचिकेच्या विरोधात सीबीआयने न्यायालयासमोर म्हणणे मांडले आहे. सचिन वाझे याला जामीन पाहिजे आहे. मात्र ती याचिका न्यायालयासमोर ठेवणे उचित नाही. गेल्यावर्षी जूनमध्ये सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. त्यामुळे त्याच्या आधारावरच न्यायालयाने विचार करावा. कायद्यानुसार जो आदेश न्यायालय घेईल तो सीबीआयला मान्य असेल, असेही त्यामध्ये म्हटले आहे.

सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात आहे. तेथूनच सचिन वाझे याने लेखी अर्ज न्यायालयामध्ये पाठवला आहे. या याचिकेमध्ये सचिन वाझेने नमूद केले आहे की, या प्रकरणामध्ये तपास सुरू आहे. खटला पूर्ण होईपर्यंत साक्ष देण्यासाठी जी व्यक्ती आहे. त्याला खटला सुरू असेपर्यंत तुरुगात का ठेवावे? जर मला साक्ष देण्या संदर्भात जर अटक केली आहे. तर साक्ष दिल्यानंतर मला सुटका मिळायला हवी. त्यासाठी माझ्या अर्जाचा विचार व्हावा असे देखील सचिन वाझे याने अर्जात म्हटलेले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. परंतु जवळपास येत्या काळामध्ये भविष्यात याबाबत खटला सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मला कित्येक वर्ष किंवा महिने हा तुरुंगवास भोगाव लागेल. हा एक प्रकारे माझ्यावर अन्याय आहे. गेल्या वर्षी जुन महिन्यामध्ये अटी घालून जामीन देण्यात आला होता. ट्रायल कोर्टासमोर सचिन वाझे साक्षीदार म्हणून अटकेत आहे. 21 जून 2022 रोजी त्यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला होता. आणि त्यामध्ये नमूद केले होते की कायदेशीर नियमाच्या आधारे खटला संपेपर्यंत सचिन वाझेला दिलासा देता येत नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.