ठाकरे गटाने आता खाली बघून चालावे : गोगावले
मुंबई : खरा पंचनामा
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दोन आठवड्यापर्यंत असल्यामुळे आम्ही ठाकरे गटाच्या आमदारांना कारवाईचा व्हीप बजावणार नाही. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजर राहण्याचा व्हीप आम्ही त्यांना बजावणार असल्याचे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. हा व्हीप कारवाईचा नाही तर नियमाप्रमाणे असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जर ऐकले नाही तर ठाकरे गटाच्या आमदारांवर रितसर कारवाई करणार असल्याचा इशारा भरत गोगावले यांनी लगावला आहे.
आमच्यावर गद्दारीचा जरी ठपका ठेवला गेला असला तरी आम्ही गद्दार नाही. आणि आम्ही गद्दार असतो तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले नसते असा टोला भरत गोगावले यानी ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही पक्ष सोडलाच नाही, त्यामुळे आता ठाकरे गटाने ठरवावे, असे गोगावले म्हणाले.
त्यांच्यावर कारवाई होणार ही शंभर टक्के होणार, त्यांनी आता खाली बघून चालावं नाही तर ठेच लागते असा इशार भरत गोगावले यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. आज आदित्य ठाकरे यांनी 32 वर्षाच्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांना घाम फोडला असं बोललं जात असले तरी अजून पर्यंत एकनाथ शिंदे यांना टक्कर देणारा अजून कोणी आला नाही असंही गोगावले यानी सांगितले.
आमच्यावर गद्दारीचा जरी ठपका ठेवला गेला असला तरी आम्ही गद्दार नाही. आणि आम्ही गद्दार असतो तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले नसते असा टोला भरत गोगावले यानी ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही पक्ष सोडलाच नाही, त्यामुळे आता ठाकरे गटाने ठरवावे.
भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आता काँग्रेसच्या सोनिया गांधी आता राजकारणापासून संन्यास घेणार आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनीही ठाकरे गटापासून संन्यास घेतला गेला तर बरं होईल कारण त्यांच्यामुळे ठाकरे गटाला थोडी स्थिरता मिळेल असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.