घरफोडी करणाऱ्यास अटक; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त : तासगाव पोलिसांची कारवाई
तासगाव : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे बंद घर फोडून दागिने, भांडी असा साडेचार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पावणेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
सोमनाथ जगन्नाथ लोखंडे (वय 43, रा. मांजर्डे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आदेश दिला होता. त्यानुसार तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे गुन्हे प्रगटिकरण पथकास कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पथकातील पथकातील सकटे व खोत यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मांजर्डे येथील सोमनाथ लोखंडे याने ही चोरी केलेली आहे. त्याप्रमाणे पथकाने मांजर्डे येथे छापा टाकून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केला असल्याचे कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बजरंग झेंडे, उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, पोहेकॉ अमित परीट, सोमनाथ गुंडे, समीर आवळे, सतिश खोत, विनोद सकटे, सायबर शाखेकडील प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.