Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाचखोरीप्रकरणी सीबीआयचे मुंबई, पुण्यात छापे

लाचखोरीप्रकरणी सीबीआयचे मुंबई, पुण्यात छापे



मुंबई : खरा पंचनामा

सीबीआयने लाचखोरीप्रकरणी मुंबई आणि पुण्यासह तीन ठिकाणी छापे टाकले. यामध्ये महत्त्वपूर्ण कागदपत्रे, डिजिटल उपकरणे/ गॅझेट्स जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच तत्कालीन दोषी उपसंचालक, डीजीजीआय, पुणे यांच्या आवारातून चार लाख रुपये आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी उपसंचालक विमलेश कुमार सिंग, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी राहुल कुमार या दोघांविरुद्ध 11 जानेवारी रोजी पुणे येथील महासंचालक कार्यालयातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी 10 मार्च 2022 रोजी करचुकवेगिरीच्या आरोपावरून फिर्यादीच्या जागेवर पुण्यात छापा टाकला होता. तक्रारदाराच्या फर्मवर दाखल केलेला खटला बंद करण्यासाठी आणि अनुकूलता दाखवण्यासाठी संबंधित लोकसेवकांनी तक्रारदाराकडून एक कोटी रुपये मागितले.

सीबीआयच्या फिर्यादीनुसार, फिर्यादीने 20 एप्रिल 2022 रोजी लेखी तक्रार दाखल केली. ज्यामध्ये आरोपींनी त्यांना आणखी त्रास न देण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्धची कार्यवाही बंद करण्यासाठी आधी 50 लाख रुपयांची मागणी केली.

तक्रारीत नमूद केलेल्या आरोपांची पडताळणी 20 एप्रिल, 21 एप्रिल, 25 मे आणि 26 मे 2022 रोजी करण्यात आली. यामध्ये असे आढळून आले, की संशयित अधिकाऱ्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्याला प्रलंबित चौकशीच्या संदर्भात वारंवार फोन केले होते. तसेच, पडताळणीत एक कोटी रुपयांची रक्कम मागितल्याचेही समोर आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.