कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस बेळगावमधून सुटणार
कोल्हापूर : खरा पंचनामा
सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभरासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसही आजपासून (दि. 5) आठ दिवस बेळगावमधून सुटणार आहे.
पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी बंद न ठेवता या गाड्या कोल्हापूर ते कऱ्हाडपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.
कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा या दोन्ही पॅसेंजर 2 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पॅसेंजर रद्द झाल्याने मिरजेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या प्रवाशांना पहाटे साडे पाच ते सकाळी पावणे अकरापर्यंत एकही ट्रेन उपलब्ध नसेल. यामुळे प्रवाशांना पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी येणारी महालक्ष्मी किंवा 10 वाजून 45 मिनिटांनी सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसने कोल्हापूरला यावे लागणार आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी 2 मार्चपर्यंत कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. यापूर्वीच 26 जानेवारीपासून बंद केलेल्या सातारा-पुणे व पुणे-सातारा पॅसेंजर 2 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अमृत भारत योजनेचा भाग म्हणून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या यादीत कोल्हापूर, मिरज, सांगली आणि सातारा या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 2.41 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये सुमारे 2,800 किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्यमान रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे लाईन टाकणे यांचा समावेश आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील 1,275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.