भरधाव दुचाकी टोल बुथला धडकून एक ठार; एक गंभीर जखमी
सांगली : खरा पंचनामा
सांगलीवाडी येथील टोल नाक्याजवळ भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची जोराची धडक बंद असलेल्या टोल बुथला बसली. या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. बुधवारी पहाटे हा अपघात झाला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
राजू संभाजी पाटील (वय ४३ रा. बुधगाव) असे मृताचे नाव आहे. तर सुरेश भिकू हिवरे (रा. बुधगाव) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृत राजू संभाजी पाटील आणि जखमी सुरेश हिवरे हे दोघेजण मित्र असून ते आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगाव मध्ये राहतात. मंगळवारी कवठेपिरान गावचा उरूस असल्याने राजू पाटील हे सुरेश हिवरे यांच्या मोटारसायकलवरून उरुसाला जेवण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा कवठेपिरानमधून ते घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले.
पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ते इस्लामपूर-सांगली या महामार्गावरील सांगलीवाडी टोलनाक्याजवळ आले. भरधाव वेगात दुचाकी असल्याने त्यांना स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नाही. त्यांची गाडी स्पीड ब्रेकरवरून उडाल्याने नियंत्रण सुटून गाडी थेट बंद असलेल्या टोल बूथवर जाऊन आदळली. या अपघातात राजू पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक सुरेश हिवरे हे गंभीर जखमी झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.