Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेअर मार्केट फसवणूक : ‘पिनॉमिक व्हेंचर’च्या तिघांना पोलिस कोठडी

शेअर मार्केट फसवणूक : ‘पिनॉमिक व्हेंचर’च्या तिघांना पोलिस कोठडी





सांगली : खरा पंचनामा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दीडपट रक्कम परतावा म्हणून देण्याचे आमिषाने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी कंपनीच्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पिनॉमिक प्रकरणात कोल्हापूर येथील एका बड्या व्यक्तीचे नाव चर्चेत आहे. आणि ती व्यक्ती माध्यमांशी संबंधित असल्याचीही चर्चा आहे.

पंकज पाटील, अभिजीत जाधव, संतोष घोडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील मुख्य सूत्रधार विपूल प्रकाश पाटील याच्यासह दोघे अद्याप पसार आहेत. दरम्यान, दोन कोटी ८४ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.  

पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपीसह विविध कंपन्यांत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीनंतर दहा महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्या आमिषाने माध्यमातून सांगलीसह अन्य जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. सुमारे बावीस कोटींचा तक्रारी दाखल करण्यात आल्या. कोट्यवधींची फसवणूकीचा गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते. इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

सांगलीतील व्यापाऱ्याने जुलै ते नोव्हेंबर २०२१मध्ये तब्बल दोन कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम गुंतवली होती. गुंतवलेल्या रक्कमेपोटी दहा महिन्यानंतर दीडपट रक्कम देण्याचे सांगितले होते. टीडीएस नको असल्यास रोखीने पैसे दिले जातील, असेही संशयितांनी सांगितले. मात्र, परतावा देण्यास टाळाटाळ झाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला. कोट्यवधीचा घोटाळा असून पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपीच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

विपुल पाटील याच्यासह दोघे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. कारवाईत सहायक निरीक्षक वाघ यांच्यासह अमोल लोहार, दीपक रणखंबे, विनोद कदम, उदय घाडगे, दीपाली पाटील यांचा सहभाग होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.