राज्यपालांनी ते पत्र प्रसिद्ध करावे
चिंचवड : खरा पंचनामा
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने पत्राद्वारे आपल्याला 15 दिवसांच्या आत या आमदारांची नियुक्ती करावी, असे सांगितले होते. याचा राग आल्यानेच 12 आमदारांची यादी लटकवली असा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता.
त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचे पत्र प्रसिद्ध करावे. पत्राचा अर्थ काय निघतोय ते लोकांनाही कळेल असे म्हटले आहे. पहाटेचा शपथविधी होऊन तीन वर्षे झाली आहेत. ज्या गोष्टीला हजार दिवस उलटून गेले आहेत, ते आता काढून काय उपयोग आहे का ? तेच तेच उगाळत बसण्यात काय अर्थ आहे. नागपूर अधिवेशनात चार ते पाच जणांची भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली होती.
तेवढ्यापुरती ती लावून धरली. त्यानंतर ते सरळ सांगतात असे काही झालेले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपकडून नवीन मुद्दे उकरून काढले जातात. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चाललेला हा भाजपचा केवीलवाणा प्रयत्न आहे, असेही पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.